पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टि वर अधिकार असतो का?जाणून घ्या संपूर्ण माहिती!

जनसामान्यामध्ये अशा प्रकारची धारणा आहे की, पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वर ५० टक्के हिस्सा असतो, म्हणजे जवळजवळ अर्धा हिस्सा हा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये पत्नीचा असतो.परंतु कायदेशीररित्या हे संपूर्ण सत्य आहे का? कायदेशीर रित्या हे संपूर्ण सत्य नाही. कारण अजून पर्यंत असा कोणताही कायदा नाही की पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वरती ५० टक्के हिस्सा हा प्रस्थापित होईल.

पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर कशा प्रकारे अधिकार असतो व किती प्रमाणात असतो याची सविस्तर माहिती:

१. लग्नानंतर पत्नीने स्वतः एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती स्वतः विकत घेतली असेल, त्या संपत्तीचे मुख्य नाव पत्नीच्या नावाने असेल किंवा ती संपत्ती पूर्णपणे तिच्या नावावर असेल तर ती प्रॉपर्टी तिची झाली. त्या संपत्तीवरती पतीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो.

२. एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पतीने स्वतः विकत घेतलेली असेल आणि ती संपत्ती त्याच्या स्वतःच्या नावावर जर असेल तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती पत्नीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो.

३. पत्नीने जर एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली. प्रॉपर्टी घेण्याकरता चे संपूर्ण पैसे स्वतः जवळचे वापरले मात्र त्या संपत्तीचे मुख्य नाव हे आपल्या पतीच्या नावाने केले असेल, म्हणजेच त्या पत्नीने ती प्रॉपर्टी आपल्या पतीच्या नावे विकत घेतली. अशा कंडिशन मध्ये त्या संपत्तीवरती पूर्ण अधिकार हा पतीचा होतो.

पण मात्र अशी प्रॉपर्टी पत्नीला मिळू शकते. पण ती मिळवण्यासाठी पत्‍नीला दिवाणी खटला दाखल करावा लागतो व पत्नीला हे स्पष्ट करावे लागेल की ही प्रॉपर्टी स्वतः विकत घेतली आहे. समजा ती महिला नोकरी करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल तर तिने नोकरीतून किंवा त्या व्यवसायामधून जी आवक आहे त्यातून ती प्रॉपर्टी घेतलेली आहे.त्यांनंतरच सदर मालमत्तेवर पत्नीला हक्क प्रस्थापित करता येईल.

४. एखाद्या पतीने एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली व संपत्ती घेताना सर्व पैसे हे पती ने लावले आणि प्रॉपर्टीला नाव मात्र पत्नीचे लावले म्हणजे संपत्ती चे मुख्य नाव हे पत्नीच्या नावाने आहेत तर त्या प्रॉपर्टी वरती संपूर्ण अधिकार हा पत्नीचा होतो. प्रॉपर्टी घेताना पैसे कुणीही देवो मात्र त्या संपत्तीचे नाव ही ज्याच्या नावे आहे किंवा ती संपत्ती ज्याच्या नावावर आहे त्याचा त्या प्रॉपर्टीवर अधिकार होतो. अशा घडामोडी मध्ये जर पतीला ती संपत्ती मिळवायची असेल तर पतीला सुद्धा दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा लागतो व त्याला सुद्धा कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल की ही संपत्ती घेताना त्याने स्वतः पूर्ण पैसा लावलेला आहे. जेव्हा कोर्टात हे सिद्ध होईल की ही पूर्ण संपत्ती याची आहे. तेव्हाच पतीचा त्या संपत्तीवर अधिकार सिद्ध होतो.

५. एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पती व पत्नी या दोघांनी मिळून घेतली. ती प्रॉपर्टी घेताना पैसे सुद्धा दोघांनी लावले व त्या प्रॉपर्टी चे नाव सुद्धा दोघांच्या नावे आहे. अशा वेळेस त्या प्रॉपर्टीवर ती पती-पत्नी दोघांचाही अधिकार हा सारखाच असतो. मग अशा वेळेस त्या प्रॉपर्टीचे विभाजन कशा पद्धतीने केले जाते? अशी प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येतो त्या पैशाचे सारखे दोन भाग केले जाते व आपला -आपला हिस्सा प्रत्येकाला दिला जातो.

जर पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत असतील, किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल तर मात्र पत्नी पतीकडून हिंदू विवाह कायदा कलम २४ व २५ नुसार मेन्टेनन्स मनी घेऊ शकते. त्यालाच आपण मराठीमध्ये खाओटी किंवा पोटगी असे म्हणतो. आता मेंटेनन्स मनी हा जो असतो तो पत्नीच्या निर्वाह किंवा भरण-पोषण यासाठी प्रत्येक महिन्याला कोर्टाने ठरवून दिलेली एक रक्कम असते जी रक्कम पतीने पत्नीला दर महिन्याला द्यायची असते अल्युमिनी जर असेल तर अशावेळी दोघांमध्ये म्युच्युअल डिवोर्स झालेला असतो. अशावेळी वन टाइम सेटलमेंट केली जाते असे असताना पत्नीला एकाच वेळेला एक ठराविक रक्कम दिली जाते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.