कामशेत पोलिसांनी फक्त ५ तासात अपहरण झालेल्या युवकाची केली सुटका

कामशेत; मुलीने केलेल्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांची मान्यता नसल्यामुळे मुलीच्या दिराचेच अपहरण केल्याची घटना कामशेत येथे घडली. याप्रकरणातील अपहरण झालेल्या युवकाची कामशेत पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या पाच तासात सुखरूप सुटका केली.

कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मंगेश भोसले याने गेल्या महिन्यात त्याच्या कॉलेज मधील मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. मुलीच्या नातेवाईकांची प्रेम विवाहाला मान्यता नसल्याने ते सतत मुलीला परत ये असा आग्रह धरीत असले तरी मुलगी घरी परत जाण्यास नकार देत होती.

आरोपिंनी सोमवार (दि.२९) सात वाजण्याच्या सुमारास दोन फोर व्हिलर घेऊन कामशेत येथे येऊन त्यांनी मुलीचा दीर अभय मंगेश भोसले (वय १८ वर्षे) याचे अपहरण करून लोणावळा दिशेने पळून गेले आणि जाता जाता त्यांना “आमच्या मुलीला परत पाठवा नाहीतर तुझ्या भावास जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देखील दिली. याबाबत शुभम मंगेश भोसले (वय २४) यांनी कामशेत पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे व स्टाफसह पोलीस ठाण्याच्या वाहनाने पाठलाग सुरु केला. घटनेची माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख व सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग नवनीत कुमार कांवत यांना दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.