झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करुन सावत्र आईचा निर्घृण खून

सांगली : सांगलीतील कवठेमहांकाळ तालूक्याजवळील हरोली येथील एका मुलानेेेच झोपेत असताना कुर्‍हाडीने वार करुन सावत्र आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या दरम्यान घडलीी.

नंदा सुर्वे ( वय ५०) असे खून झालेल्या आईचे नाव असून अमोल संभाजी सुर्वे असे खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत महिलेचे पती संभाजी सुर्वे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अधिक माहितीनुसार, बुधवारी आरोपी अमोल घरी आला. त्‍याने मृत नंदा सुर्वे यांना शिवीगाळ केली. कुऱ्हाडीने त्‍यांच्‍या कपाळ, तोंडावर आणि डाव्या गालावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्‍या नंदा यांचा जागी मृत्यू झाला. दरम्यान, नंदा या आपल्‍या नावावर बँकेमध्ये २ लाख रुपये ठेवण्याची मागणी करत होत्‍या. तर या मुलाने हाच राग मनात धरुन मुलाने ही हत्या केली आहे. अशी तक्रार वडील संभाजी बाबू सुर्वे यांनी कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. तर पोलिसांनी संशयित अमोल सुर्वे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.