रेल्वेतील सराईत चोरटा जेरबंद,दौंड लोहमार्ग पोलीसांची कामगिरी,एकुण ६ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

दौंड;लोहमार्ग पोलीस ठाणे हददीतीत रेल्वेतील बॅग चोरी उघडकीस आणून,दौंड लोहमार्ग पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.तसेच एकुण ६ लाख ७९ हजार २००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांगेश रमेश माने (वय २७ राहणार गौतमनगर ता दौड जि पुणे) असे गुन्हा दखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.राहुल रमेश जैन (वय ३८,धंदा वकील, रा. कृष्णाकेबल टाउन शिप, आय सी आय सी आय बॅकसमोर, कोंढवा, पुणे) यांनी तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुल जबलपुर पुणे एक्स. या गाडीने पिंपरी ते पुणे असा प्रवास करीत असताना गाडी केडगाव ते यवत दरम्यान असताना त्यांची फिक्कट गुलाबी रंगाची हॅण्डबॅग आतील मुददेमालासह चोरट्याने लंपास केली. दौंड लोहमार्ग पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक केली आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हयातील १० हजार रूपयांचा MI कंपनीचा मोबाईल फोन, ६ लाख ६९ हजार २००/- रू. सोन्याची लगड १४० ग्रॅम वजनाची असा एकुण ६ लाख ७९ हजार २००/-  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेंच सदर गुन्हयातील संपुर्ण मुददेमाल पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे येथे छोटेखानी कार्यक्रमात श्री सदानंद ग. वायसे- पाटील मा.पोलीस अधीक्षक सो लोहमार्ग पुणे यांच्या हस्ते फिर्यादी यांना देण्यात आला.

सदरची कामगिरी,श्री सदानंद ग. वायसे- पाटील मा.पोलीस अधीक्षक सो लोहमार्ग पुणे, कविता नेरकर- पवार मा.अपर पोलीस अधीक्षक सो लोहमार्ग पुणे,श्री.श्रीकांत स.क्षीरसागर मा उपविभागीस पोलीस अधिकारी सो लोहमार्ग विभाग पुणे,श्री मौला सय्यद पोलीस निरीक्षक सो स्था.गु.अ.शाखा लोहमार्ग पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बी.एस. अंतरकर सहा पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा लोहमार्ग पुणे, श्री वाय.एम कलकुटगे सहा पोलीस निरीक्षक दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे, पोहवा कदम, पोहवा  दांगट,पोशि  मदे,पोशि भोसले,मपोशि थोरात यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.