रोड रॉबरी करणारे २ कुख्यात गुंड गजाआड,पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी

पुणे;पुणे जिल्हयात रोड रॉबरी करणाऱ्या व मराठवाड्यात तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार गजाआड, पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी.पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुण्याला जात असताना फिर्यादी व त्याच्या साथीदारास दोन अज्ञात इसमांनी अडून जबरदस्तीने ने मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख १,८००/- असा एकूण ६७,८००/- रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.

ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३० रा.रेणापूर, रुपचंदनगर तांडा, ता.रेणापूर जि.लातूर),अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव (वय १९ रा.औसा हनुमान, खंडोबा गल्ली, लातूर जि.लातूर) अशी गुन्हा दखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.हेमंत करे (रा.पंढरपूर जि.सोलापूर)यांनी त्रक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हेमंत करे व त्याचा मित्र असे दोघेजण स्प्लेंडर मोटरसायकलवर पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुण्या कडे जात असताना रात्री ०२.०० वा. चे सुमारास सोलापूर रोडला शिवआई मदिराजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील बुलेट मोटरसायकल आडवी लाऊन हेमंत करे याची स्प्लेंडरची चावी जबरदस्तीने काढून घेवून हेमंत करे व त्याच्या साथीदाराचा मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख १,८००/- असा एकूण ६७,८००/- रुपयाचा माल जबरीने चोरुन फरार झाले असता,सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना LCB टिमला गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांनी सापळा रचून सर्राईत चोरट्यांना अटक केले.

सदर दोन्ही आरोपी यांची वैदयकिय तपासणी करुन आरोपी व मुद्देमाल दौंड पो.स्टे. चे ताब्यात दिलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि सचिन काळे,सफौ. शब्बीर पठाण,पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. काशिनाथ राजापुरे, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.