कामशेत येथे भुयारी मार्गाचे काम रखडले
कामशेत;कामशेत येथे वडीवळे गावाकडे जाण्यासाठी लोहमार्गाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे, मात्र या कामाला बरेच महिने उलटूनही भुयारी मार्गाचे काम पूर्ण होत नाही. पुलाखालील रस्त्याचे काम करण्यासाठी रेल्वेकडून उशीर होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
काम सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कामशेत रेल्वे विभागाशी वारंवार संपर्क साधला आहे. दीर्घ पाठपुराव्यानंतरही भुयारी मार्गाचे काम पूर्ण होत नाही.
कामशेत येथील भुयारी मार्गाचे काम सुरु होणार म्हणून वडीवळे गावाकडे जाणारी रहदारी ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कामशेत येथे भुयारी मार्गाचे काम सुरु करून जवळपास महिना उलटला आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!