कुंपणच शेत खातंय! लाच प्रकरणात न्यायाधीशांनाच बेड्या

कामशेत;वडगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला न्यायाधीशांना व्यवस्थापित करून रद्द करण्यासाठी खाजगी महिलेच्या द्वारे ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात लाचलुचपत विभागाने थेट वडगाव मावळ न्यायालयातील महिला न्यायाधीश यांना गुरुवारी दुपारी अटक केली आहे.

जर न्यायाधीशालाच अटक झाली तर सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अर्चना दीपक जतकर असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार गुरुवारी एसीबीने न्यायाधीश अर्चना जतकर यांना अटक केली आहे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस नाईक नवनाथ माळी, कर्मचारी सुप्रिया कादबाने, पूजा पागिरे, अविनाश इंगुळकर यांच्या पथकाने केली आहे.

न्यायव्यवस्थाच भ्रष्ट झाल्यावर न्यायालयात सर्वसामान्य गरीब जनतेस न्याय मिळणार की नाही याची चिंता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.न्यायधीशच पैसे घेऊन निकाल बदलत असतील तर नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेविषयी विश्वास राहिल का असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर समोर येत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.