मोठी बातमी : पुण्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट,धार्मिक स्थळं, मॉल, थिएटरसह पीएमपीएमपीएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आठवड्याला रुग्णांची वाढ अशीच राहिली तर पुण्यात दररोज 9 हजार नवीन रुग्ण सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

याबाबत सौरभ राव म्हणाले, “परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.

बेडची संख्या वाढवणार,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.

पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.

काय आहेत निर्बंध

 • सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
 • मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
 • धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
 • PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
 • आठवडे बाजारही बंद
 • लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत

काय सुरु?

 • संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
 • हॉटेल पार्सल सेवा सुरु राहतील
 • अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
 • लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीची अट
 • संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
 • दिवसभर जमावबंदी
 • जिम सुरु राहणार
 • दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार
 • शाळा महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद

पुण्यातील सध्यस्थिती

– पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम
– पुढील आठवड्यापर्यंत भयावह परिस्थिती
– पुन्हा एकदा पुण्यात बेडची कमतरता जाणवणार
– जिल्ह्यात मृत्युदरही वाढण्याची शक्यता
– आठवड्याची परिस्थिती पाहता निर्बंध कडक लागण्याची शक्यता
– बैठकीत लॉकडाऊन नकोचा सूर पण कडक निर्बंध लावण्याची मागणी

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.