महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेड कान्हे कंपनीसमोर जनआंदोलन

कामशेत; महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेड कंपनीच्या च्या २०५ कामगारांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने मंगळवारी (दि.३०) सकाळी ८:३० वाजता कामगारांनी कान्हे येथील महिंद्रा कंपनी समोर जनआंदोलन केले.

मावळचे आमदार सुनिल शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, बोधिसत्व जनजागृती संघाच्या अध्यक्ष संगीता वाघमारे, महिंद्रा लॉजीस्टिकचे तुषार टोंगळे व कामगार गणेश रंधे, मच्छिंद्र गुजर, अनंता गिरी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. ३०) सकाळी ८:३० वा. बैठक झाली.

या बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर कुठलाही तोडगा निघाला नाही. मंगळवारी (दि.३०) दुपारी १२ वाजता महिंद्रा लॉजीस्टिक च्या व्यवस्थापनाने गुरुवारी (दि.१) रोजी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स मधील महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेड कंपनीच्या स्थानिक २०५ कामगारांचे स्थलांतर करुन ५० टक्के वेतनामध्ये कपात केली आहे. एक वर्षाच्या अटी शर्तीवर मावळ तालुक्यातील भुमिपुत्रांना इतरत्र पाठवुन मानसिक शारीरिक व आर्थिक छळवणूक महिंद्रा लॉजीस्टिक करत आहे.

एप्रिल २००८ साली जनरल मोटर्स मध्ये महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेड सुरु झाली होती. तेव्हापासुन मावळ तालुक्यातील २०५ भुमिपुत्र कामगार कायमस्वरूपी काम करत आहेत. जनरल मोटर्स डिसेंबर २०२० मध्ये बंद झाल्याने महिंद्रा लॉजीस्टिक लिमिटेडच्या २०५ कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.