चाळीस गाईंना दिले जीवदान! नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

नगर;नगर जिल्ह्यात वाळकी गावामध्ये कत्तलीच्या हेतूने गायी बांधून ठेवल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर गोरक्षकांच्या मदतीने नगर तालुका पो स्टे चे अधिकारी श्री सानप यांनी सदर ठिकाणी छापा टाकून सर्व जनावरे ताब्यात घेतली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता सदर जमीन एका कसायांच्या मालकीची असून नगर शहरातील कत्तलखान्यामध्ये कापण्यासाठी हा गोवंश बांधून ठेवलेला होता. असे निष्पन्न झाले.

या गोवंशामध्ये भव्य शरीररेष्टीच्या कांकरेंज जातीच्या दोन गायी होत्या. ऐकून गोवंश ( निम्म्याहुन जास्त देशी गायी ) पोलिसांनी सुपा येथील माऊली कृपा गोशाळेत पाठविला. याबद्दल नगर तालुका पो स्टे चे आणि विषतः सानप साहेबांचे हार्दिक आभार !

सदरची कारवाई शरद कोतकर , हर्षद पारखे , सचिन पठारे , कृष्णा माने , सचिन शिंदे इ गोरक्षक यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.