अमर मुलचंदाणींवर आणखी एक गुन्हा दाखल; सेवा विकास बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : नियमबाह्य कर्ज मंजूर करून बॅंकेची पावणे सहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अमर मुलचंदाणी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 ते 2021 दरम्यान दि सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बॅंक, पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी विजयचंद गोपीचंद रामचंदानी (वय 52, रा. पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि.02) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक अमर मुलचंदाणी यांच्यासह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य कर्ज मंजूर केले. आरोपींनी कर्जाचे हप्ते थकवून बॅंकेची पावणे सहा कोटींची फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.