छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ;पाच जवान शहीद, १० पेक्षा अधिक जखमी

बिजापूर: छत्तीसगडगच्या बिजापूर येथे पोलीस, सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये तीन डीआरजीच्या तर दोन सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. तसेच या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. तर एकूण 20 जवान गंभीर जखमी झाले आहेत.

बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षविरोधी अभियानामध्ये एसटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे 400 जवान सहभागी झाले होते. शोध अभियानादरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला. यात दोन नक्षलवादी ठार झाले, तर पाच जवान शहीद झाले. तसेच 10 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती डीजीपी डीएम अवस्थी

दरम्यान, त्यांनी सांगितलं की सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. या घटनेत काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी जवानांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच नऊ रुग्णवाहिका चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच दोन एमआय-17 हेलिकॉप्टर देखील घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

तीन वर्षात 970 नक्षली हल्ले

दरम्यान, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी फेब्रुवारीमध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नक्षली घटनांमध्ये घट झाली आहे. 2018 मध्ये 833 तर 2019 मध्ये 670 आमि 2020 मध्ये 665 घटना झाल्या. मात्र छत्तीसगडमध्ये नक्षलवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसले. 2018 ते 2020 या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये 970 नक्षली घटना झाल्या. यात 117 जवान शहीद झाले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.