पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटुंबीक वादातून मेव्हुण्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार

चंदीगड : आपल्या पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटुंबीक वादातून एका युवकाने सासरवाडीला जाऊन आपल्या मेव्हुण्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्लाा करत  मेव्हुण्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार  केल्याची घटना समोर आली आहे.नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने मेव्हुण्याच्या पत्नीसोबत अश्लील फोटोही काढले आहेत. या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून गावात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

गुरमीत सिंह असं आरोपीचं नाव असून तो अड्डा झब्बाल येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुरमीतच लग्न 2002 साली प्रदीप सिंहच्या बहिणीसोबत झालं होतं. पण गेल्या काही वर्षांपासून आरोपीचे आपल्या पत्नीसोबत खटके उडत होते. त्यामुळे आरोपीची पत्नी 2015 पासून आपला भाऊ प्रदीप सिंहसोबत राहत होती. आरोपी गुरमीतच्या मनात या घटनेचा राग होता.काही दिवसांपूर्वी आरोपी गुरमीतने आपल्या बायकोचा फोटो एका अश्लील ग्रुपमध्ये टाकला होता. तसेच तिच्या मोबाइल नंबरही सार्वजानिक केला होता. त्यामुळे मेव्हुणा प्रदीप सिंहने याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. याच कारणांमुळे आरोपी गुरमीतने गेल्या गुरूवारी मेव्हुण्याच्या घरात घुसून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आहे. संबंधित घटना पंजाबमधील बटाला येथील एका गावातील आहे.

यावेळी स्वतः चा बचाव करण्यासाठी मेव्हुण्याची पत्नी बाथरूममध्ये जाऊन लपून बसली. पण नराधम आरोपीने मेव्हुण्याच्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्काराची आणि हत्येची धमकी दिली. त्यामुळे तिला बाथरूममधून बाहेर यावं लागलं. यानंतर आरोपी गुरमीतने आपल्या मेव्हुण्याच्या पत्नीवर बलात्कार केला. पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती होती. दरम्यान त्याने तिचे काही अश्लील फोटोही क्लिक केले आहेत.

आरोपी गुरमीत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी मेव्हुण्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याचबरोबर पीडित महिलेचीही वैद्यकिय चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये बलात्काराची पुष्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही, पोलीस ठाण्याचे एसएचओ अमोलकदीप सिंह यांनी दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.