माझ्याकडे लायसन्सचे पिस्तूल आहे, तुला बघून घेतो असे म्हणत धमकी देउन शिवीगाळ करणाऱ्याला अटक; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी

पुणे : माझ्याकडे लायसन्सचे पिस्तूल आहे, तुला बघून घेतो असे म्हणत धमकी देउन शिवीगाळ करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे

रामेश्वर यशवंत हरगुडे (वय 30, रा. केसनंद वाघोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी म्हस्कु केरबा मोडक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवाची उरुळी येथे फिर्यादी मोडक यांचे हॉटेल पुरंधर आहे. त्याठिकाणी फिर्यादी मोडक व सुदाम आंबेकर व पप्पू आंबेकर यांच्यात जुन्या फ्लॅटच्या व्यवहाराबाबत बोलणे सुरू होते. तर यावेळी पप्पू आंबेकर याचा मेव्हणा हरगुडे तेथे आला. त्याने फिर्यादी मोडक यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्याने म्हस्कूला मारहाण करून कंबरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले. माझ्याकडे पिस्तूल आहे, तुला बघून घेतो, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली होती.

यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तात्काळ हरगुडे याला अटक केली आहे. त्याच्याकडे पिस्तूलाचा परवाना असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झिंजूके, महिला उपनिरीक्षक काटे, पोलीस नाईक राणे, दिंगबर साळूखे यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.