वादातीत फ्लॅटची विक्री करुन 15 लाखांची फसवणूक, दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : वादातीत फ्लॅट क्लिअर असल्याचे दाखवत त्याची विक्री करुन 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब किसन साठे (वय 49, रा. मावळ, पुणे) व नरेंद्र प्रभाकर माणिकपूरकर (वय 60, रा. पिंपरी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी दशरथ बबन पानमंद (वय 51, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नोव्हेंबर 2018 ते आजपर्यंत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व वादातीत फ्लॅट क्लिअर असल्याचे दाखवत त्याची विक्री केली. तसेच, त्याचा दस्त करुन 15 लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यलमार करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!