चंद्रपूरमध्ये गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रचंड खळबळ

चंद्रपूर : भद्रावती शहरातील बाजारपेठ येथे राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली.ही घटना शनिवारी (दि. ३) संध्याकाळी भद्रावती येथे घडली.याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.आरती जयप्रकाश चटपल्लीवार (वय 20 वर्ष रा. बाजार वार्ड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आरतीने घरातील रूममध्ये छताला ओढनी बांधून गळफास घेतला. तिचे आईने रूममध्ये बघितले असता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.