डिलीव्हरी बॉयच्या बॅगची चोरी करणाऱ्या सराईतांना खडक पोलिसांकडून अटक

पुणे : फिल्पकार्ड डिलीव्हरी तरूणाची बॅग चोरून 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना खडक पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून दुचाकीसह 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अजय ऊर्फ अज्जु ऊर्फ अज्जम हनुमंत राडम (वय  29) आणि तुषार ऊर्फ चिऊ राजेश नागपुरे (वय  20, दोघेही रा. गंज पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हर्षद सुनिल पानकर (वय  23) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद भवानी पेठेतील एका सोसायटी ग्राहकाला डिलीव्हरी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी रस्त्यावर पार्क करून त्याला बॅग अडकविली होती. काही वेळानंतर चोरट्याने 20 हजारांचे साहित्य असलेली बॅग चोरून नेली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास सुरू असताना सराईत नागपुरे आणि पानकर यांनी बॅग चोरून नेल्याची माहिती पोलीस अंमलदार राहुल मोरे व समीर माळवदकर यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पीएमसी कॉलनीसमोर ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ अजिज बेग, फहिम सैय्यद, गणेश सातपुते, संदिप पाटील, अमेय रसाळ, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.