मोठी बातमी : मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होणार?
मुंबई :महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनचा निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध वर्गातील लोकांसोबत चर्चा करून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याने कठोर निर्बंध लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येऊ शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी लॉकडाउनबाबतचे संकेत दिले होते. तसंच, करोनाला कसं रोखायचं याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील उद्योगपती, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज रविवार असूनही बैठक आयोजित केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
तज्ज्ञांसोबत चर्चा
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी तज्ज्ञांकडून पर्याय जाणून घेतले. वृत्तपत्रांचे मालक, संपादक, वितरक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत संपर्क साधला. तसंच, व्यायामशाळातील मालक, संचालत, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. तसंच, सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!