लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार,गर्भवती राहिल्यावर उघडकीस आला प्रकार

नागपूर : लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घृणास्पद कृत्यातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शुभम शंकरराव रोडके (वय २४, रा. गणेशपेठ पोलिस क्वार्टर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम याचा भाऊ नागपूर पोलिस दलात कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी वाणिज्य शाखेची अकरावीची विद्यार्थिनी आहे. दीड वर्षापूर्वी तिची पोलिस क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या शुभम रोडके याच्यासोबत ओळख झाली. तो इंजिनिअर असून एका खासगी कंपनीत नोकरीवर आहे. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. डिसेंबर २०२० मध्ये त्याने तिला पोलिस क्वॉर्टरवर बोलावले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला.

शुभम याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. घरी कुणी नसताना तिच्यावर क्वॉर्टरमध्येच बलात्कार केला. मार्चमध्ये रियाची प्रकृती बिघडली. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. यामुळे आईला धक्का बसला.

मुलीकडे विचारणा केली असता शुभम याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे सांगितले. मुलीच्या आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शुभम याला अटक केली. त्याची चार दिवस पोलिस कोठडी घेतली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.