विमानतळ परिसरात सराईत गुन्हेगारांवर सपासप वार करून खून

पुणे : विमानतळ येथील के़ के़ पार्क कॉर्नर परिसरात एका सराईत गुन्हेगारावर तीन ते चार जणांनी चॉपर व धारधार हत्यारांनी सपासप वार करत वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. . आरोपी कारमधून पसार झाले असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

सुमित जगताप (वय ३२) असे खून झालेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित जगताप हा के. के. मार्केट येथील एका मिठाईच्या दुकानात आला होता. तेथे त्याचा काही जणांबरोबर वाद सुरु झाला. त्यातून एक महिला व दोन पुरुषांनी त्याच्यावर हल्ला केला. सुमित हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ३ गुन्हे दाखल आहे.

सुमित याचे दोन विवाह झाल्याचे समजते. सध्या तो दुसर्‍या पत्नीबरोबर राहतो. त्याची पहिली पत्नी व तिच्या कुटुंबियांबरोबर वाद आहेत. त्यातूनच हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेने मात्र लोहगाव भागात चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्याच्या चेहऱ्यावरच फक्त वार करत त्याचा खून केला आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्य यामधून तर हा प्रकार घडला नसावा, या दृष्टीनेही तपास
सुरू आहे.विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.