कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न पाळता कंपनी मध्ये कामकाज चालू,कंपनी मालकांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर;कोविड १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांसाठी कोणतेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता कामकाज चालू ठेवल्याने कंपनी मालकांवर शिकापुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोष सुदाम शिवले, कंपनी मालक (रा.सनसवाडी. रेवती इंटरप्रायजेस डोंगरवस्ती सणसवाडी) असे गुन्हा दखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहतीनुसार, कोविड १९ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांसाठी कोणतेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता, कामावर असलेल्या कामगारांना कोणतेही सॅनिटायझर, मास्क, थर्मामिटर, आस्कीमिटर,सामाजितक अंतर ठेवणे आवश्यक असतांना सदर नियमांचा भंग करून समाजातील जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेले हयगयीचे वर्तन केले. त्या बाबत शिकापुर पोलीस स्टेशन यांनी कारवाई करून, सदर आरोपीविरूध्द भा.द.वी.कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ सह साथीचे रोग प्रतिबंध कायदा १८९७ चे कलम २,३,४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.