विनामास्क इतरत्र भटकणारे टोळके गजाआड, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मंचर; कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळता विनामास्क इतरत्र भटकत असतांना मिळुन आलेले दोन सर्रास टोळक्यांविरुद्धा मंचर पोलिसांनी केली कारवाई. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

राजेंद्र सावळेराम काळु (वय ३० रा.लौकी,ता.आंबेगाव,जि.पुणे, मुळेवाडी चौक), मनोज रमेश शिंदे (रा.अवसरी खुर्द, ता.आंबेगाव, जि.पुणे) अशी गुन्हा दखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मंचर पोलीस स्टेशन हददीतील शिवाजी चौक मंचर परिसरात दोन टोळके विनामास्क इतरत्र भटकताना दिसले असता,टोळक्यांविरुद्धा मंचर पोलिसांनी कारवाई केली असुन होंडा शाईन मोटार सायकल क.एम.एच. १६बी.टी.७२५०, होंडा कंपनीची युनीकॉर्न मोटार सायकल क.एम.एच.१४ एफ. एफ.७०३९ ,आरोपी जवळ मिळून आले. सदर प्रकरणा बाबत मंचर पोलीस स्टेशन यांनी कारवाई करण्यात आली आहे. वरील आरोपींविरूध्द भा.दं.वि कलम १८८,२६९, रा.आ.व्यवस्थापन कायदा कलम ५१ सह साथिचे रोग कलम २,३,४, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.