बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांकडून एकाला अटक

पिंपरी चिंचवड : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहे. ओंकार रवींद्र गुंजाळ (वय 25, रा. घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल येथे पिरबाबा दाजवळ एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आहे, अशी माहिती पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घरकुल येथे सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच ओंकार पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त केली.ओंकार याने मागील तीन महिन्यांपूर्वी हे पिस्टल आरोपी सलीम याच्याकडून खरेदी केले होते. सलीमवर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असून तो एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , यांचे सुचना व मार्गदर्शना खाली आनंद भोईटे, पोलीस उप-आयुक्त, परि-२. सजंय नाईक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, सतीश माने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विट्टल बढे पोलीस उपनिरीक्षक, व डी.वी.पथकातील पोलीस अंमलदार पो.ना विपुल होले. पो.ना. विश्वास नानेकर, पो.ना. चोरगे, पो.शि संतोष सपकाळ, पो.शि सचिन नलावडे चिखली पो.स्टे.यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.