निर्बंधाविरोधात पिंपरी चिंचवडमधील सलून व्यावसायिक रस्त्यावर, मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध

पिंपरी चिंचवड :वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पिंपरी चिंचवड मधील सलून व्यवसायिक रस्त्यावर उतरले आहेत.पिंपरी चिंचवडमध्ये मुंडन आंदोलन करून त्यांनी सरकारचा निषेध केला

पिंपरी चिंचवडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मुंडन आंदोलन करून त्यांनी सरकारचा निषेध केला. कोरोना नियमांच्या अधीन राहून इतर व्यवसाय सुरू ठेवलेत, तसेच आमचे व्यवसाय सुरू ठेवण्याची सरकारने परवानगी द्यावी. आधीच्या लॉकडाऊनमुळं निर्माण झालेली परिस्थिती निस्तारताना आमचं कंबरडे मोडले आहे, पुन्हा ती वेळ आमच्या येऊन देऊ नये. अशी मागणी नाभिक संघटनेने केली

या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, उपाध्यक्ष समाधान गवळी, हेमंत श्रीखंडे, पुंडलिक सैंदाणे, रामदास सूर्यवंशी, अशोक पंडित, सचिन सूर्यवंशी, नागेश कोकाटे, गणेश शिंदे, प्रशांत जाधव, किशोर पवार, दीपक खंडे, राजेंद्र राऊत, शकील शेख, रोप शेख, समशेर भाई शेख, अभय श्रीमंगले श्रीखंडे, गणेश शिंदे, प्रशांत जाधव, किशोर पवार, दीपक खंडे, राजेंद्र राऊत,  चेतन चित्ते, संदीप महाले, विठ्ठल पंडीत, जमील शेख, सुनील पवळे, राजू कोकाटे, अनंत शिंगारे, इरफान शेख, नु र शेख, जमीर शेख उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दोन हजार सलून आहेत. कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून या सलूनचा उल्लेख केला जातो. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांत रोज दोन अडिच हजाराने कोरोना रुग्ण वाढत होते. रविवारी तो आकडा एकदम ३२०० पर्यंत गेल्याने महापालिका प्रशासनाची पाचावर धारण बसली. तत्काळ सर्व सलून दुकाने बंद करण्यात आली आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.