पुण्यातील सुरक्षारक्षकाकडून भटक्या कुत्र्यांवर अनैसर्गिकरित्या अत्याचार ; विकृताला अटक

पुणे : मॉडेल कॉलनी परिसरात एक सुरक्षारक्षक भटक्या कुत्र्यांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.

बाबुराव भाऊराव मोरे (वय 65, रा. जनता वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पल्लवी भैरप्पा गौडा (वय 28) यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनीत एका सोसायटीत बाबुराव मोरे हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत. सोसायटीच्या गेटवर बसणाऱ्या एका भटक्या कुत्र्याला त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये उचलून नेले. त्यानंतर आदबाजूला नेहून त्याच्यावर अत्याचार केले होते. मात्र कोणीतरी पाहात असल्याचे लक्षात आल्याने त्याने त्या कुत्र्याला सोडून दिले.

गौडा यांनी हा प्रकार प्राण्यांचे डॉक्टर शाभवी सबणीस यांना सांगितला. त्यांनी बचाव पथकाच्या सदस्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पथकाने काही दिवस पाळत ठेवली. पण, त्यांना असा प्रकार आढळला नाही. मात्र, शनिवारी मध्यरात्री गौडा यांना पुन्हा तो सुरक्षारक्षक कुत्र्याला उचलून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.

तसेच, बचाव पथकाच्या सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉ. शाभवी सबणीस व इतर सदस्य घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांनादेखील हा प्रकार कळविला. तो सुरक्षारक्षक अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखविले. त्या कुत्र्याला बावधन येथील रेस्कू चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी मोरे याला अटक केली आहे.अधिक तपास चतुःश्रुगी पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.