राज्यातल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यास पुण्‍यातही लॉकडॉऊनची वेळ बदलणार का? आयुक्तांकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण 

पुणे : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात रात्री 7 ते सकाळी 6 दरम्यान लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे तर पुण्यात सध्या सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान लॉकडॉऊन सुरू आहे. राज्य सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी झाल्यास पुण्‍यातही लॉकडॉऊनची वेळ बदलली जाऊ शकते. मात्र, पुण्यातील परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुण्यातील लॉकडॉऊनची वेळ बदलली जाणार नाही असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात रविवारी नवे रुग्ण सुमारे 6225 आढळले आहेत.तर पिंपरी चिंचवडमध्येेेेेेेेेेेेेेेे 3823 नवे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राव म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढती आहे. त्यामुळे सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान लॉकडॉऊन करण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. पुण्यातील निर्णयाबाबत शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्या बैठकित आढावा घेतला जाईल. त्यानंतर परिस्थितीत काही बदल झाला तर, लॉकडॉऊनबाबत सुधारित निर्णय घेतला जाईल.’’

रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची सध्या दमछाक होत आहे. रुग्णसंख्या वाढत राहिली तर, त्यामुळे पुण्यात आखणी कडक निर्बंध लागू होऊ शकतात.

या पाश्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशात राज्यात रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी असेल, असे म्हटले आहे. पुणे वगळता राज्यात उद्या रात्री (5 एप्रिल) 8 पासून  रात्री 8 पासून सकाळी 7 पर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून कामगारांवर बंधने नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल.

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू

किराणा, औषध, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.

प्रार्थना स्थळे दर्शनार्थींसाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थनास्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थींसाठी बंद राहतील. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. या कर्मचार्‍यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणार्‍या अभ्यागतासाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणार्‍या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणार्‍या ग्राहकांना सुरक्षित अंतर, नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही, असे दिसले तर स्थानिक प्रशासनास ते पूर्णपणे बंद करता येईल

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.