कामशेत येथील टोनी ढाब्याजवळ आढळला अज्ञात मृतदेह

कामशेत;जुन्या पुणे – मुंबई महामार्गालगत कामशेत शहराजवळील नायगावच्या हद्दीत टोनी ढाब्या जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे.

याप्रकरणी नायगावचे पोलीस पाटील महेश राणू चौधरी (वय २८) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर टोनी ढाब्याजवळ शहाजान शेख यांच्या पडिक जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. या प्रकरणी शुक्रवारी ( दि.२) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आहद गुलाब मुलानी यांनी नायगावचे पोलीस पाटील महेश चौधरी यांना यासंदर्भात माहिती दिली. हा इसम सुमारे ४० ते ४५ वर्षाचा असावा असा अंदाज आहे. त्याच्या अंगात फिक्कट खाकी रंगाची पॅंट घातलेले आहे. त्याचा चेहरा व शरीर सडलेले आहे.

याप्रकरणी कामशेतच्या पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे पुढील तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.