इंदापूर मधील देशपांडे व्हेज हॉटेलवर गुन्हा दखल,जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे केले उल्लंघन

इंदापूर; पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दि.३ एप्रिल पासून पुढील सात दिवस शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाचे पालन न केल्याने इंदापूर पोलिसांनी शहरातील हॉटेल चालकावर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्या दि.२ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये दि. ३ एप्रिल २०२१ पासून पुढील सात दिवस/पुढील आदेशापर्यंत संपूर्ण हॉटेल बंद राहतील व फक्त पार्सल सेवा चालू राहील असा आदेश असताना देखील इंदापूर शहरात गस्त घालत असते वेळी आज दि.४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका येथे उदय सदाशिव देशपांडे ( रा. अंबिकानगर, इंदापूर) यांनी त्यांच्या मालकीचे हॉटेल देशपांडे व्हेज हे चालू ठेवून हॉटेलमध्ये गर्दी जमवून खाद्यपदार्थाची विक्री करीत असताना मिळून आल्याने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाचा भंग केल्याने हॉटेल चालकावर भादवि कलम १८८ , २६९ ,२७० महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ ( w ) ( n ) आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५ चे ३० , ३३ ,३४ ,४१ , ५१ व भारतीय साथ रोग कायदा १८९७ कलम ३ , ४ प्रमाणे गुन्हा केला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संजय बबन कोठावळे नेमणूक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे. फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत हे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.