अवैध वाळू उपसा करणार् यांवर यवत पोलिसांची कारवाई; तीस लाखाचा मुद्देमाल जप्त
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील मुळा-मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या साह्याने हा बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत यवत पोलिसांनी 3 ट्रक वाळूसह ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत 30 लाख रुपये आहे. तर, या अवैध वाळू उपसा प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल चौधरी (रा.नायगांव ता.हवेली, पुणे), राजेंद्र गायकवाड (रा.हडपसर, पुणे ), निखील माणिक मगर (रा.नायगांव ता.हवेली, पुणे ), अजिंक्य भाउसाहेब शेळके, आशिष शेळके (दोन्ही रा.शेळकेवस्ती केडगांव ता.दौंड) तसेच इतर तीन ट्रक चालक व एक जेसीबी मशीन चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील मुळा-मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा सुरू होता. याची माहिती यवत पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तत्काळ पोलीस कर्मचारांचे पथक घेऊन येथे छापा टाकला. येथे ट्रक वाळू चोरी करताना पोलिसांना दिसले. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच ट्रक आणि जेसीबी मशीन जागीच ठेवून चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.
यानंतर पोलिसांनी एक जेसीबी मशीन, तीन वाळू वाहतूक करणारे ट्रक व त्यामधील अंदाजे साडेबारा ब्रास अशी प्रत्येकी 8 हजार रूपये प्रमाणे 1 लाख रूपयांची वाळू; असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सार्वजनिक ओढ्याचे व पर्यावरणाचे नुकसान करून वाळू चोरी केल्याप्रकरणी यवत पोलीसचे शिपाई विजय आवाळे यांनी यवत स्टेशनला फिर्याद दिली आहे. या नऊ जणांवर भा.द.वि.का.क.379, 34 व पर्यावरण संरक्षण कायदा व कलम 9,15,21, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधि. 1984 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!