काळजाला चटका लावणारी घटनाा; कोरोनामुळे 24 तासात जुळ्यांनी हरवलं आईचं छत्र, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना

पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. कोरोनाने जुळ्या चिमुकलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपून गेलं आहे. मायेची ऊब घेण्याचं नशीब देखील या बाळांच्या नशिबी आलं नाही. कारण कोरोना बाधित आईचा प्रसूतीनंतर अवघ्या चोवीस तासात मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना वायसीएम रुग्णालयात घडली.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 4 एप्रिलला ऑक्सिजन खालावल्याने 36 वर्षीय महिला पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाली. तेंव्हा अँन्टीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. 5 एप्रिलला सीझर केल्यानंतर तिने जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला. बाळांची कोरोनाची अँन्टीजेनही निगेटिव्ह आली. पण दोन्ही चिमुकल्या आईच्या कुशीत येण्याआधीच, त्यांच्या आईला कोरोनाने हिरावून घेतलं.

पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतायेत. पैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल आहे. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन हा गरोदर महिलांसाठी घातक ठरत असल्याचे दिसत असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांना सांगितले. प्रसूतीची वेळ जवळ आली की अनेक गरोदर महिलांना त्रास जाणवत असतो. पण तो त्रास रुटीन भाग आहे. असं समजून ते अंगावर काढणं गरोदर महिला आणि बाळाच्या दृष्टीने धोकादायक ठरू लागले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.