चाकणमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक, तीन किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड : अवैधरित्या गांजा बाळगून तो विक्रीसाठी आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला चाकण पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी तीन किलो 659 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 5) रात्री खेड तालुक्यातील कोळवे येथे करण्यात आली.

सचिन गणपत आवळे (वय 32, रा. कोळवे, ता.खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याची महिला साथीदार राणी महेश जगनाडे (वय 40, रा. कोळवे, ता.खेड) हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळवे गावात दोघेजण गांजा विक्री करत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. त्यात पोलिसांनी आरोपी सचिन याला अटक केली. त्याच्याकडून 92 हजार 975 रुपये किमतीचा तीन किलो 659 ग्राम वजनाचा पाने, फुले, बिया-बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा गांजा जप्त केला. आरोपी गांजा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गांजा विक्रीसाठी वापरला जाणारा वजन काटा देखील जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्तnप्रेरणा कटट्रे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उप निरीक्षक, विजय जगदाळे, स.पो.फौ/ विठठल कुंभार, पोहवा सुरेश हिंगे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरेे ,पोकॉ/ अशोक दिवटे, निखील वर्षे, मपोकॉ सुप्रिया गायकवाड यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे हे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.