बेटिंग गेमद्वारे खंडणी मागणाऱ्या दोघांना तीन लाख स्वीकारताना अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : बेटिंग गेमद्वारे 30 हजार पॉइंट जिंकून देत त्याबदल्यात 30 लाखांच्या खंडणीसाठी तरूणाचे अपहरण करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने 3 लाख रूपये घेताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल रमाकांत एकबोटे (वय 29, रा. बाणेर, पुणे) व सौरभ पांडुरंग माने (वय 25, रा. बाणेर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी तरूणाला लोटस अ‍ॅपद्वारे ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कसिनो गेमवर बेटिंग लावण्याचा छंद आहे. त्याची एका मित्राच्या मध्यस्थीतून आरोपींची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला बेटिंगमध्ये जादा पॉइंट कमवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादीने स्वतःचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड आरोपींना दिली. त्यानंतर आरोपी अमोल एकबोटेने ऑनलाईन बेटिंगद्वारे 30 हजार पॉइंट फिर्यादी तरूणाला मिळवून दिले. त्याबदल्यात 30 लाख रूपये देण्याची मागणी आरोपींनी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना अमोल एकबोटे, सौरभ माने, आदित्य वर्मा, ओंकार व दया लांडगे यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्यांना जबरदस्तीने त्यांची चारचाकी (एम एच 12 क्यु एफ 7156) यातून खेड शिवापुर येथे घेऊन गेले.

आरोपी अमोल एकबोटे याने फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावुन घेतला व व्हॉटसॲपवरुन फिर्यादी यांच्या पॅनकार्डचा फोटो दर आठवड्याला 3 ते 4 लाख रुपये देणे आहे, असा मेसेज टाईप करुन स्वतःला पाठवला.फिर्यादीला कात्रज चौकात सोडून दिले.त्यानुसार तरूणाने फिर्याद दिल्यानंतर  सोमवारी (दि.05) तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, विनोद साळुंके. शैलेश सूर्य, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ, संपत औचरे, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, महीला पोलीस रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.