लॉकडाऊनचे कडक निर्बंध जाहीर होताच विक्रिसाठी मद्याचा साठा करुन घेवुन जाणाऱ्या दोघांना अटक, १० विदेशी मद्याचे बॉक्स जप्त

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊन मध्ये कडक निबंध जाहीर होताच विक्रिसाठी मद्याचा साठा करुन घेवुन जाणारे ०२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडुन स्वीफ्ट गाडीसह १० विदेशी मद्याचे बॉक्स असा एकूण ५ लाख २२ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरज बाबु कांबळे (वय. २३ वर्षे रा. पाटील नर्सिंग होम शेजारी,
धावडेवस्ती भोसरी पुणे) व सुरज संतोष मिसाळ ( वय. २४ रा. साई आनंदनगर, बाबाआनंद मंगलकार्यालय पुढे, धावडेवस्ती भोसरी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या देशांतर्गत कोरोना या विषाणुचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत असल्याने या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकरीता कडक उपाय योजना करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश असल्याने आज (दि.६) रोजी दिघी पोलीस ठाणे तपास पथक हददीत कारवाईकामी फिरत असताना दुपारी दिडच्या सुमारास देहुफाटा चौकाकडुन च-होली फाटा चौकाकडे संशयित रित्या आलेली स्वीफ्ट गाडीस (नं. एम.एच.१४/एच.डब्ल्यु.३ ०९७) थांबवली.पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत १० विदेशी मद्याचे बॉक्स पोलीसांनी मिळाले.

पोलिसांनी गाडी मधील दोन्ही व्यक्तीकडे चौकशी केली असता सध्या लॉकडाऊन मध्ये कडक निर्बंध जाहीर झाल्याने सदरचा दारुसाठा विक्रिकरीता घेऊन जात असल्याचे त्यानी सागितले.त्यांच्याकडुन स्वीफ्ट गाडीसह १० विदेशी मद्याचे बॉक्स असा एकूण ५ लाख २२ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

 

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर साो. परि-१, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे , चाकण विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, दिघी पोलीस ठाणे, सहा.पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहा.पोलीस उप निरीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस हवालदार वसंत गायकवाड, पोलीस हवालदार प्रदिप पोटे, पोलीस नाईक चंद्रकांत जाधव, पोलीस नाईक गणेशभुषण गोसावी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कु-हाडे, पोलीस शिपाई विजय पाटील, यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.