उद्योग, व्यवसाय, हॉटेल चालवताय? सर्वांसाठी अत्यावश्यक असलेले शॉप ॲक्ट लायसेन्स काढा एका क्लिक वर

शॉप ॲक्ट लायसेन्स कसे काढायचे?

गुगल वर जाऊन ‘आपले सरकार’ टाईप करायचे आहे त्यानंतर तिथे दिलेल्या न्यु यूजर या पर्यायावर क्लिक करून तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.आणि मगच तुमचे रजिस्ट्रेशन होइल. रजिस्ट्रेशन झाल की तुम्ही जो रजिस्टर मोबाइल नंबर वापरला आहे, त्या मोबाईल नंबरवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो आणि तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे, तसेच खाली दिलेला कॅपचा लेटर टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे. असे केल्यानंतर तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल ,त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, त्या नुसार तुम्हाला जी सोईस्कर भाषा आहे ती तुम्ही निवडू शकता.

या पुढे डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, इथे तुम्हाला सर्च हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला ‘shop and establishment’ हा पर्याय निवडायचा आहे.

असे केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल तिथे indivitual आणि organization यापैकी indivitual हा पर्याय निवडायचा आहे आणि submit या बटणावर क्लीक करायचे आहे त्यानंतर ओपन होणाऱ्या डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायांपैकी shop अँड establishment application या पर्यायावर क्लिक करुन तुमच्यापुढे दोन फॉर्म चे पर्याय दिसतील, एक असेल तो म्हणजे शून्य ते नऊ कामगार असेल तर आणि दुसरा म्हणजे दहापेक्षा जास्त कामगार असले तर समजा मी शून्य ते नऊ वर्ग असा पर्याय निवडला त्यानंतर खाली confirm या बटणावर क्लिक करायचे आहे असे केल्यावर तुमच्यापुढे form F उघडेल.

या फॉर्ममध्ये सर्वप्रथम विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्यासाठी उपलब्ध असलेले जवळील ऑफिस त्याचे नाव निवडायचे आहे ,खाली दिलेल्या आस्थापनेचे नाव या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या दुकानाचे नाव टाकायचे आहे जे की तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर त्याच्या बाजूला ते मराठीमध्ये आपोआप लिहून येईल.

त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये आस्थापने पूर्वीची सविस्तर माहिती या ठिकाणी new registration हा पर्याय निवडायचा आहे व खाली दिलेल्या आस्थापनेचे पत्ता व विभाग या खाली तुम्हाला तुमच्या दुकानाचा पत्ता व्यवस्थितपणे टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर खाली व्यवसाय सुरू करण्याचा दिनांक हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला व्यवसाय चालू करण्याचा दिनांक टाकायचा आहे. व त्याखाली व्यवसायाचे स्वरूप टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय प्रायव्हेट आहे कि पब्लिक सेक्टरमध्ये आहे यापैकी एक पर्याय निवडायचा आहे .खाली दिलेल्या मनुष्यबळ/ कामगार तपशील या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे किती कामगार आहेत त्यापैकी स्त्रिया किती आहेत पुरुष किती आहेत आणि इतर किती आहेत हे टाकायचे आहे.

त्याच प्रमाणे खाली मालकाचे पूर्ण नाव जेकी आधार कार्ड वर दिलेले असेल त्याप्रमाणे टाकायचे आहे आणि त्याखाली मालकाचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे.त्यानंतर खाली व्यवसायाचे वर्ग कोणता आहे जसे की दुकाने/सायबर कॅफे/थेटर यापैकी जे असेल ते निवडायचे आहे.

नंतर आस्थापनेचा प्रकार टाकायचा आहे जसे की मालक/भागीदारी/कंपनी इत्यादी.तसेच खाली दिलेल्या रकान्यात तुम्हाला तुमच्या कामगारांची नावे, पुरुष किती ,स्त्रिया किती आणि इतर किती हे टाकायचे आहे.अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यावर खाली दिलेल्या self decleration वाचून घ्यायचं आहे.आणि I agree या पुढील बॉक्स मध्ये क्लिक करायचे आहे. व submit या बटन वर क्लिक करायचे आहे.असे केल्यावर तुमच्या पुढे स्क्रीन वर एक मेसेज येईल.ज्यावर एक application id दिलेला असेल त्यावर ok या बटन वर क्लिक करायचं आहे. पुढे आपल्याला upload documents हा पर्याय दिसेल तिथे क्लिक केल्यावर कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याची साईज काय असावी हे दिले आहे.

त्याप्रमाणे तुम्हाला तुमची कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहेत.डाव्या बाजूला दिलेल्या self declaration या पर्यायावर क्लिक करून जो फॉर्म येईल तो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यावर खाली मालकाचे नाव आणि सही करून पुन्हा तो फॉर्म pdf मध्ये बनवून अपलोड करायचा आहे.

त्याचप्रमाणे आधार कार्ड, दुकानाचा मराठी पाटी असलेला फोटो, तुमचा पासपोर्ट फोटो, सही हे सगळे अपलोड केल्यावर ,जर तुमचा सायबर कॅफे असेल तर noc द्यावी लागेल आणि other या पर्यायाला टिक करून पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स हे देखील अपलोड करायचे आहे. सर्व केल्यावर upload या बटन वर क्लिक करायचे आहे.

या पुढे पेमेंट भरण्यासाठी पेज येईल यामध्ये ऑनलाइन आणि चलन भरून असे दोन पर्याय येतील. त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता. समजा आपण online पर्याय निवडला ,यानंतर खाली confirm या बटन वर क्लिक करायचे आहे.

असे केल्यावर maha online चा पेमेंट गेटवे ओपन होईल. जिथे तुम्ही वॉलेट /डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग या पैकी काहीही वापरून पैसे भरू शकता.पैसे भरल्यावर यशस्वी रित्या पेमेंट भरल्याचा मेसेज दिसेल.फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या back या बटन वर क्लिक करायचे आहे.यानंतर तिथे उजव्या बाजूला download form करुन तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो प्रिंट करू शकता. तसेच खाली download intimation receipt वर क्लिक करून तो आपल्याला पाहता येईल. जे की तुमचे शॉप ऍक्ट लायसेन्स असेल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.