ग्रामीण भागात अचानक लॉक डाऊन व्यापारी व जनता हवालदिल

भिगवण (नारायण मोरे) :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सोमवार दि.05 रोजी सायंकाळी उशीरा नवा आदेश पारित केला असून या आदेशान्वये दि.30 एप्रिल पर्यंत पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत सह छावणी परिषद हद्दीत लाॅकडाकऊनची मुदत दि.30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.सदर नियमावली चा अवलंब दि.05 एप्रिल पासून रात्री 08 पासून लागू करण्यात येईल.

या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून यामध्ये पुढीलप्रमाणे आदेश आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07 ते सायंकाळी 06 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जमा होण्यास प्रतिबंध करण्यात येत असून कलम 144 ( जमावबंदी) लागू कारण्यात आली आहे.त्याचप्रमाणे सोमवार से शुक्रवार सायंकाळी 06 ते सकाळी 07 पर्यंत आणि शुक्रवार सायंकाळी 06 से सोमवार सकाळी 07 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कारण/ अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याली नागरिकांना पार पाडापास पूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) करण्ययात आली आहे.

■ अत्यावश्यक सेवा पुढील प्रमाणे

हॉस्पिटल, रोग निदान केंद्र(डायग्नोस्टिक सेंटर) दवाखाने, आरोग्य आयुर्विमा कार्यालय, मेडीकल दुकाने, मेडीकल कंपन्या व इतर मेडीकल आरोग्य सेवेशी निगडित असलेल्या सेवा
किराणा दुकाने, डेअरी, बेकरी, भाजीपाला, फळे, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने व इतर सेवा.
सार्वननिक वाहतूक व्यवस्था उदा. रेल्वे,टॅक्सी, रिक्षा, सार्वनगिक बसेस,विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
मान्सूनपूर्वी करणेत येणारी कामे.
मालाची/वस्तूंची वाहतूक,शेतीसंबंधित सेवा
ई-कॉमर्स
मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्याच्याशी संबंधित सेवा.
अत्यावश्यक सेवशी संबंधित सर्व प्रकारचे माहिती तंत्रज्ञान,अद्योग/सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या आत्यावश्यक सेवा.
सर्व उद्याने/सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 06 ते सकाळी 07 वाजेपर्यंत बंद राहतील. आणि शुक्रवारी रात्री 06 ते सोमवारी सकाळी 07 वाजेपर्यत बंद राहतील.
नागरीकांनी सदर ठिकाणी वावरताना सामाजिक अंतर ( Social Distancing) व स्वच्छता सॅनिटायझेशन बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सदर ठिकाणी नागरीकांकडून सामाजिक अंतर ( Social Distancing ) व स्वच्छता ( Sanitaion) बाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासनाकडून वरील नमूद सार्वजनिक ठिकाणे तात्काळ बंद केली जातील.
सर्व प्रकारची दुकाने,मार्केट, माॅल,अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्णपणे बंद राहतील.

■वाहतूक नियम

रिक्षामध्ये 2 व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तर चारचाकी मधून क्षमतेच्या पन्नास टक्केच व्यक्तींना प्रवास करता येईल. बस मधून उभा राहून प्रवास करता येता नाही.
नागरिकांनी प्रवास करताना मुखपट्टी (मास्क) वापर करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास 500/- रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनात प्रवाशांद्वारे मुखपट्टी ( मास्क) चा वापर बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास चारचाकी वाहन चालक आणि प्रवासी यांना प्रत्येकी 500/- रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येईल.
प्रत्येक ट्रीपनंतर वाहन सॅनिटाईज करावे लागेल.

बंद काय असेल ..

सिनेमागृहे, नाट्यगृहे,मनोरंजन पार्क,आर्केड्स,व्हिडिओ गेम पार्लर,वाॅटर पार्क, स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा (जिम),क्रिडा संकूल,क्लब इत्यादी आस्थापना बंद राहतील.
चित्रपट/मालिका,जाहिरातींचे शुट करण्याकरिता मोठ्या संख्येने कलाकारांसह दृष्यांचे शुटींग करणे टाळावे. कलाकार व कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसाचे कोवीड तपासणीचे दाखले सोबत बाळगणे गरजेचे आहे.
पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीतील हाॅटेल,रेस्टाॅरन्ट,बार,फुडकोर्ट,
हाॅटेल बंद राहील.हाॅटेल साठी केवळ पार्सल किंवा घरपोच सेवा दिलेल्या नियमित वेळेत चालू राहिल.
हाॅटेलमधील रेस्टाॅरन्ट/बार हे रुम सर्व्हिससाठी खुले राहतील परंतु बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध असेल.
सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळा,महाविद्यालये,शैक्षणिक संस्था यांचे नियमीत वर्ग पूर्णपणे बंद राहतील.10 वी 12 वीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम, सभा संमेलने व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
अत्यसंस्कार, दशक्रिया व त्याच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहिल.
रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे स्टॉल (टपऱ्या) मध्ये अन्न पदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. फक्त पार्सल घेऊन निर्गमित वेळेत परवानगी राहील.

यामुळे अचानक केलेल्या लॉकडाऊन व्यापारी वर्गातील नाराजी व्यक्त होत आहे .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.