सावधान! कामशेत पोलिसांची विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
कामशेत;कामशेत येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना अनेक कामशेतकर नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तोंडाला मास्क न लावता प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकीस्वारांवर कामशेत वाहतूक पोलिसांची बारीक नजर आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु आहे.
अनलॉक च्या टप्यात सवलत मिळताच रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली होती. कामशेतकरांना कोरोनाचे तिळमात्र गांभीर्य राहिले नाही. या पार्श्वभूमीवर सध्या कामशेतच्या वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच मोठा फटका बसणार आहे.
यामध्ये कामशेत कडून पवनानगर कडे जाणाऱ्या चौकात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. कामशेत मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देखील कामशेत पोलिसांनी कारवाईचा बडगा चालवला आहे. यामध्ये जर दंड न भरल्यास भा. द. वि. कलम १८८ व २६९ नुसार कडक कारवाई करताना कामशेत पोलीस दिसत आहेत. यामध्ये विनामास्क वाहन चालवणे, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपलसीट गाडी चालवणे, विना वाहन परवाना मोटारसायकल चालवणे, भरधाव गाडी चालवणे अश्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.
कामशेतचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय खंडागळे, तुषार घाडगे व वाहतूक विभागातील कर्मचारी ही दंडात्मक कारवाई करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!