कामशेत मध्ये लॉकडाउन तरीही गर्दीने भरले पूर्ण टाउन
कामशेत;कामशेत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी देखील कामशेत मधील सुजाण नागरिकांच्या मनात कोरोनाबद्दलची भीती काही फारशी दिसत नाही. आज कामशेत मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले आहेत. सकाळपासूनच कामशेत शहरामध्ये सर्व आस्थापने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.
सकाळपासूनच कामशेत शहर अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद असले तरीही नागरिकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. कामशेत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कामशेत पोलीस प्रशासन कटीबद्ध आहे. तरीही पोलीस प्रशासनाला कामशेत मधील नागरिक सहकार्य करताना दिसत नाहीत.
कामशेतच्या बाहेरील नागरिकांनी व कामशेत मधील नागरिकांनी खरेदीसाठी येताना मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स चे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन कामशेतचे सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज जगताप व कामशेतचे उद्योजक श्री. प्रवीण सुतार यांनी केले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!