क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून विमानाची तिकिटे खरेदी ; बँकेसह ग्राहकांच्या तब्बल २९ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड : क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून २९ लाख ७४ हजार ८३३ रुपयांची विमानाची तिकिटे खरेदी केली. यात आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकाची व बँकेची फसवणूक झाली आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन माध्यमातून घडला आहे.

मिलिकअर्जुन परमेश्वर नंदर्गी (वय 40, रा. हिंजवडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 7) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन माध्यमातून घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदर्गी आयसीआयसीआय बँकेत डेप्युटी मॅनेजर आहेत. त्यांच्या बँकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडीट कार्डची माहिती अज्ञात व्यक्तीने हॅक केली. त्या माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने विमानाचे तिकीट खरेदी केले. त्यासाठी त्याने 29 लाख 74 हजार 833 एवढी रक्कम वापरली.

यामुळे बँकेचे ग्राहक आणि बँक अशी दोघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.