पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आवाहन करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत पोलीस आयुक्त कार्यालयात अनेक नागरिक आपल्या समस्या / तक्रारी घेवून येतात . परंतू कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच कार्यालयात सततच्या होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने भेट देणाऱ्या नागरिकांना व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही .

या पार्श्वभूमिवर नागरिकांना पोलीस आयुक्तालयात भेटीसाठी कोरोना संसर्ग कालावधी जोपर्यंत पुर्णतः आटोक्यात येत नाही तोपर्यंत नागरिकांनी सहकार्याची भुमिका ठेवुन कार्यालयात येण्याचे टाळावे , जेणेकरून आपली व आपल्या कुटुंबाची तसेच पोलीस आयुक्तालयातर्गत कामकाज करणारे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे आरोग्य सुरक्षित राहील . तरी देखिल जर पोलीस आयुक्त यांची भेट घेणे अत्यावश्यक असेल तरच शासनाने घालून दिलेल्या नियम , अटि व शर्तीचे योग्य ते पालन करून नागरिकांनी नियोजित वेळ घेवुन भेट घ्यावी . किंवा ज्या नागरिकांच्या गभीर स्वरूपाच्या तक्रारीअसल्यास त्यांनी त्यांचा अर्ज लेखी स्वरूपात पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांचे नावे करून या कार्यालयास पाठवावा . तसेच पोलीस अधिकारी / अंमलदार हे कोणत्याही प्रकारे नागरिकांकडून त्यांचे कामासाठी पैशाची मागणी करित असल्यास किंवा त्यांचे मोबाईल संभाषण होत असल्यास त्यांचे मोबाईलची रेकॉडींग करावे. तसेच व्हॉट्सअॅप व्दारे कॉल करत असल्यास अशा व्हॉट्सअॅप कॉलचे दूसऱ्या मोबाईलच्या साहाय्याने रेकॉर्डिंग करून पाठवावे . अशा पोलीस अधिकारी / अंमलदार यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल .

पिंपरी चिंचवड शहराला अवैध धंदे मुक्त करण्यासाठी पोलीसांप्रमाणे एक जबाबदार नागरीक म्हणून नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा आहे . तरी नागरिकांना अवैध धंद्याबाबत व इतर कोणत्याही प्रकारची काही तक्रार असल्यास  पोलीस आयुक्त  कृष्ण प्रकाश यांचे मोबाईल नंबर ९ १३४४२४२४२ या क्रमांकावर सपंर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.