अल्पवयीन मुलीशी लग्न करुन लैंगिक शोषण; तरुणावर गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही १६  वर्षांच्या मुलीशी लग्न करून तिचे लैंगिक शोषण करत गर्भवती करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत पिडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडला.

नागेश दशरथ लांडगे (वय २५, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

नागेश लांडगे याने एका १६ वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती केले.वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.