खळबळजनक! बँकेच्या परीक्षेला आलेल्या पाथर्डीच्या तरुणाची निर्घृण हत्या; कोपऱ्यापासून हात तोडला
औरंगाबाद : राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून बँकेच्या परीक्षेसाठी शहरात आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह हात नसलेल्या स्थितीत आढळला.
विकास देवीचंद चव्हाण (वय 23) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.मारेकऱ्यांनी विकास चा एक कोपरापासून एक हात धडावेगळाकरून सोबत नेला अथवा कुठेतरी फेकून दिला असे चित्र घटनास्थळी होते. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली .
नगर जिल्ह्यातून रिझर्व्ह बँकेच्या परीक्षेसाठी विकास गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये आला होता. आज सकाळी महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानातमध्ये त्याचा खून केलेल्या अवस्थेत प्रेत आढळुन आले. विशेष म्हणजे सकाळी आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती.
या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे. शिवाय त्याच्या गळा कापण्यात आला आणि छातीत चाकू खुपसण्यात आल्याचे समोर आले . आज सकाळी सिटीचौक पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीने फोन करून या घटनेची माहिती कळविली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक, अविनाश आघाव , संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली
दरम्यान, पोलिसांना विकासच्या खिश्यात एसटीचं तिकिट सापडलं. एसटीच्या तिकिटावरुन मृतदेहची ओळख पटली. त्यावरून पोलिसांना मृतव्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!