जाणून घ्या, पुण्यातील विकेंड लॉकडाऊनमध्ये काय असणार सुरू, काय राहणार बंद

पुणे : राज्य सरकारने आज संध्याकाळी ते सोमवार सकाळी पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे, हा विकेंड लॉकडाऊन संध्याकाळी सहा ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.या कालावधीत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी करण्यात आली आहे.यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी

ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आलीय. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहेय

 

* आजपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत संचारबंदी.. केवळ मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व दुकाने बंद.. सकाळी 6 ते 11 या वेळेतच दूध विक्रीला परवानगी

* महापालिका हद्दीतील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या काळात प्रवासासाठी परवानगी असेल.. प्रवास करताना विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

* पुणे महानगर पालिका हद्दीतील खानावळी या फक्त पार्सल सेवेसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरू राहतील.

* महापालिका हद्दीतील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम शनिवार व रविवार सुरु राहील.

*महापालिका हद्दीतील घर काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक, आणि आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत/ नर्स यांना आठवड्यातील सर्व दिवस प्रवास करण्यास मुभा राहील

* लसीकरण सुविधा आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहील

* महापालिका हद्दीतील मद्य विक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधेसाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहतील.

* PMPML सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार

* कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार

* कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरु राहणार

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.