पिंपळे गुरवमधील जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा, ६ जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा मारून ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ४४ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) रात्री जवळकर नगर, सुदर्शन चौक पिंपळे गुरव येथे करण्यात आली.

संदीप किसन रावते (वय 40, रा. पिंपळे गुरव), निखील नंदकुमार पवार (वय 33, रा. नढे नगर, काळेवाडी), संदीप राजेंद्र वडमारे (वय 28, रा. पिंपळे गुरव) राजू दत्तात्रय जाधव (वय 32, रा. नवी सांगवी), नबी दौलत शेख (वय 35, रा. भोसरी), सनी उर्फ चित्रसेन भगवान घरवाढवे (वय 28, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील सुदर्शनचौकात रुक्साना शेख यांच्या तीनमजली इमारतीच्या गच्चीवर सनी घरवाढवे याच्या रूममध्ये काहीजण आर्थिक फायद्यासाठी रम्मी जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सनी घरवाढवे याच्या रूममध्ये छापा मारून कारवाई केली. त्यात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडून ४४ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.