गुंगीचे औषध देऊन आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीवर ओला कॅब चालकाने केला बलात्कार, पुणे हादरले
पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीला ओला कॅब चालकाने गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरूणीचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. ही घटना 4 ते 30 मार्च दरम्यान धायरी परिसरातील एका लॉजवर घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी खराडी परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीत नोकरी करते. आरोपी प्रमोद ओला कॅब चालक आहे. चार मार्चला तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार प्रमोद त्याठिकाणी कॅब घेऊन गेला. त्यानंतर तरुणी मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी तरुणीला तहान लागली असता प्रमोदने तिला गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास दिले.
पाणी पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर प्रमोदने तिला धायरीतील गोकूळ लॉजवर नेले. त्यानंतर त्याने तरुणीने कपडे काढून मोबाईलमध्ये फोटो काढले. अश्लिल फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तिच्यार बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!