तडीपार आरोपीस पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पथकाकडून अटक

पिंपरी चिंचवड : तडीपार गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाकडून अटक केली आहे. गुरुवारी (दि.08) हि कारवाई करण्यात आली.शांताराम उर्फ पप्पू रामचंद्र कांबळे (वय 30, रा. ओटास्किम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त  रामनाथ पोकळेे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ साो., सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने, पोलीस अंमलदार – हजरत पठाण, प्रविण तापकिर, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहीते व शुभम कदम यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.