दोघा लहान मुलांना ‘धाक’ दाखवून नराधमाने केले लैंगिक शोषण ; नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना

संगमनेर : संगमनेर शहरालगत गोल्डन सिटी परिसरात दमदाटी करून दोन मुलांचे लैंगिक शोषण खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस स्टेशनला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याने (पोक्‍सो) गुन्हा नोंदवून आला असून, आरोपीला अटक झाली आहे. सचिन चांगदेव केदारी (रा. देवाचा मळा, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.

या बाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात राहणाऱ्या बारा व तेरा वर्षीय मुलांना आरोपी केदारी याने तुम्ही बांधकामाचे गज चोरले आहेत, ही गोष्ट मी तुमच्या घरीच सांगतो असे म्हणून त्या बालकांना आरोपी मजकूर याने धाक दाखविला. त्यानंतर त्याने त्यातील बारावर्षीय मुलाला मी तुला स्कुटी चालवायला शिकवतो असे म्हणत तर तेरावर्षीय मुलाला धाकासह खर्च करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून गोल्डन सिटीजवळील काटवनात वेगवेगळ्या वेळी नेऊन गेला. तेथे आरोपीने मुलांना दमबाजी करीत त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याच्या या कृत्याला त्या मुलांनी विरोध केला असता आरोपीने पुन्हा दमबाजी केली.

दरम्यान, या दोघांसोबत सातत्याने हा प्रकार घडल्यानंतर संबंधित पीडित मुलांनी सदरचा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.त्यानंतर गुरुवारी रात्री दोन्ही बालकांच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही मुलांशी संवाद साधून त्यांच्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर केदारे याच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कलम 377 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे (पोक्‍सो) 6 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.