पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आणखी 100 बेड वाढविले – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आणखी 100 ऑक्‍सिजन बेड  उपलब्ध केल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यानी दिली आहे.यात ICU with Ventilator चे 20, ICU Without Ventilator चे 60 आणि Oxygen चे 20 बेड्स आहेत. जम्बो आता पूर्ण क्षमतेने सुरु झाले असून एकूण बेड्ससंख्या ७०० वर गेली आहे.या ठिकाणी सध्या 600 रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाचे नवीन बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दररोज बेडची मागणी वाढत असून ऑक्‍सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक आहे.त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या खाटांसह महापालिकेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्यानुसार, आता जम्बो मध्ये 520 ऑक्‍सिजन बेड, 120 एचडीयू- आयसीयू बेड तसेच 40 व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. तर, 20 साधे बेड आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.