मोक्का गुन्हयातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाकडून अटक

पिंपरी चिंचवड : मोक्का गुन्हयातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई काल (दि. ९) रोजी करण्यात आली.

नितीन सुधाकर भोसले (वय 21, रा. आदर्शनगर,गणराज कॉलनी काळेवाडी पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी नितीन हा खेड तालुक्यातील भैरवनाथ ट्रकबॉडी गॅरेज मोई येथे येणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाच्या पोलीसांना मिळाली. मिळालेल्या बातमीचे आधा रेपोलिसांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन त्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली.आरोपीला पुढील कारवाईकरीता वाकड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून पुढील अधिक तपास सहा. पो आयुक्त श्रीधर जाधव हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने, पोलीस अंमलदार – हजरत पठाण, प्रविण तापकिर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहीते व शुभम कदम यांनी केली आहे.

 

 

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.