साताऱ्यात आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे ‘भीक मागो’ आंदोलन

 

सातारा : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन  सुरू आहे. यादरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत अत्यंत कडक निर्बंध लावले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी याला विरोधही होताना दिसत आहेत. साताऱ्यात तर स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भीक मागो आंदोलन केले.दुपारी सातारा येथील पोवाईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसून भीक मागो आंदोलन केले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होतं. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन भीक मागो आंदोलन करत त्यांनी निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलकी कारभाराचाही निषेध व्यक्त केला. उदयनराजे यांनी यावेळी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवरून राज्य सरकारवर टीका केली.

यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.उदयनराजे यांनी या अगोदर देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. “संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाउन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.