हिंजवडीत प्राधिकरणाच्या नोटीस कडे दुर्लक्ष करून बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : बेकायदेशीर बांधकामाला अनधिकृत बांधकाम व निर्मुलन अप्पर जिल्हाधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावली होती. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवणा-या विरोधात शुक्रवारी (दि.09) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक जयवंत गायकवाड (वय 26) व अनिता विनायक गायकवाड ( दोन्ही रा. जांबे ता. मुळशी) असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ‘पीएमआरडी’चे सहाय्यक नगररचनाकार विवेक प्रभाकर डुब्बेवार (वय 36, रा. नांदेड सिटी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांचे बेकायदेशीर बांधकाम पूर्ण केले. बेकायदेशीर बांधकामाला अनधिकृत बांधकाम व निर्मुलन अप्पर जिल्हाधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावली होती. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 52, 53, 54, 55, 56 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!